प.पू.श्री शंकर व्यंकटेश टाकी उर्फ श्री बाबा (१८३०-१९०२) शीव (सायन-मुंबई) येथे राहत होते. त्यांच्या घरीच सत्संग-भजन चालत असे. सन. १९०२ मध्ये श्री बाबांचे देहावसान झाले. त्यांचे सुपुत्र व शिष्य प.पू. रामचंद्र शंकर टाकी उर्फ श्रीभाई (१८५७-१९३५) ह्यांनी सत्संग-भजनक्रम पुढे चालू ठेवला. कोणा एका चित्रकारा कडून ज्याचे नांव राघोजी होते त्याच्याकडून प.पू.श्रीबाबांचे तैलचित्र तयार करून घेण्यात आले. ते तैलचित्र सद्भक्ति मंदिरात लावण्यात आले आहे. इ.स.१९२२ मधील विजयादशमीच्या सुमुहूर्तावर ‘सद्भक्ति प्रसारक मंडळी’ नामक संस्था स्थापन करण्यात आली. इ.स.१९२३ त शिवची जागा व बंगला सिटी इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने विकत घेतल्यामुळे मुंबई नजीकच सरस्वती बाग, अंधेरी (त्यावेळेस जोगेश्वरी स्टेशन नव्हते) येथे दुसरी जागा खरेदी करून ‘श्री शंकर लॉंज’ या नांवाची नवीन इमारत बांधण्यात आली. ह्या इमारतीच्या वरच्या मजल्यास ‘सद्भक्ति मंदिर’ असे नांव देऊन शिवात स्थापना केलेल्या भक्ति मार्गाचा भजन पूजन क्रम यथासंग चालू ठेवण्या करिता तो संबंध मजला सद्भक्ति प्रसारक मंडळीच्या स्वाधीन करण्यात आला.
सद्भक्ती प्रसारक मंडळी
- सौ मुक्ता शशांक गुप्ते [सुळे]
- श्री विवेक ताम्हाणे
- श्री नागानंद निलेश्वर
- श्री समीर रायकर
- श्री गौतम मुरकुंडे
- श्री अरुण विजयकर
- ऍड. शैलेश दळवी
- श्री प्रकाश सुळे (वामन)
- श्री अशोक टणक