PROGRAMS

About Us
प.पू.श्री शंकर व्यंकटेश टाकी उर्फ श्री बाबा (१८३०-१९०२) शीव (सायन-मुंबई) येथे राहत होते. त्यांच्या घरीच सत्संग-भजन चालत असे. सन. १९०२ मध्ये श्री बाबांचे देहावसान झाले. त्यांचे सुपुत्र व शिष्य प.पू. रामचंद्र शंकर टाकी उर्फ श्रीभाई (१८५७-१९३५) ह्यांनी सत्संग-भजनक्रम पुढे चालू ठेवला. कोणा एका चित्रकारा कडून ज्याचे नांव राघोजी होते त्याच्याकडून प.पू.श्रीबाबांचे तैलचित्र तयार करून घेण्यात आले. ते तैलचित्र सद्भक्ति मंदिरात लावण्यात आले आहे.
इ.स.१९२२ मधील विजयादशमीच्या सुमुहूर्तावर 'सद्भक्ति प्रसारक मंडळी' नामक संस्था स्थापन करण्यात आली. इ.स.१९२३ त शिवची जागा व बंगला सिटी इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने विकत घेतल्यामुळे मुंबई नजीकच सरस्वती बाग, अंधेरी (त्यावेळेस जोगेश्वरी स्टेशन नव्हते) येथे दुसरी जागा खरेदी करून 'श्री शंकर लॉंज' या नांवाची नवीन इमारत बांधण्यात आली. ह्या इमारतीच्या वरच्या मजल्यास 'सद्भक्ति मंदिर' असे नांव देऊन शिवात स्थापना केलेल्या भक्ति मार्गाचा भजन पूजन क्रम यथासंग चालू ठेवण्या करिता तो संबंध मजला सद्भक्ति प्रसारक मंडळीच्या स्वाधीन करण्यात आला.
INQUIRY/SUGGESTION
Submit below details
Contact Us
You want to talk to us? Lets get in touch
Address
Saraswati Baug
Hindu Friends Society Road
Jogeshwari East, Mumbai,
Maharashtra 400060, India

Contact Person
Call - +91-9820350867tamhanevivek@gmail.com
Mr.Arun Vijaykar
Call - +91-9223222245arunvijaykar@gmail.com
Mr.Naganand Nileshwar
Call - +91-9821270772nileshwar@rediffmail.com

Visiting Hours/वेळापत्रक
वि. सू. :- काही विशिष्ट कारणास्तव अधून मधून वरील वेळापत्रकात योग्य ते बदल करणे गरजेचे ठरते. तरी दर्शनेच्छु भक्तांना विनंती आहे की त्यांनी संपर्क Contact Persons ह्या मथळ्याखाली दिलेल्या व्यक्तींपैकी कुणालाही संपर्क करून वेळेची खात्री करून घ्यावी, जेणे करून तसदी आणि निराशा टळेल.